August 7, 2011

Chandrakor...

कालची गम्मत.....रात्र झाली की चांदोमामा कुठे आहे अशी शोधाशोध सुरु होते पण एकीकडे माझा हात घट्ट धरलेला असतो ...पण काल घरी परत येताना एकदम आकाशाकडे बोट दाखवून म्हणाली 'आई ते बघ चांदोमामा आपल्याकडे बघून हसतोय' ...पोरीला हा काय नवीन शोध लागला असे म्हणुन मी वरती बघितले तर चंद्रकोर होती...मला पूर्ण चंद्रा पेक्षा चंद्रकोरीचे जास्त आकर्षण आहे .....पण ती चंद्रकोर आपल्याकडे बघून हसत असते हे काही मला जाणवले नव्हते...लहान मुले किती निरागस पणे नकळत काहीतरी बोलून जातात...

No comments:

Post a Comment