April 2, 2012

Two sides of the same coin...

लहान पणी खेळताना आठवतय ...एका मुलीला कायम टार्गेट करायचो आम्ही ....
नाव आठवत नाही आता...
पण तसेही नावात काय आहे..असे Shakespeare म्हणून गेला आहे...
तर काय नाव महत्वाचे नाही...वृत्ती महत्वाची...
तर ती मुलगी होती घाबरत...सारखी मागे मागे राहणारी...
तिला राज्य दिले की कधी कोणाला आउट करता यायचे नाही ...
खेळ खूप वेळ सुरु रहायचा...ती जीव खाउन पळत रहायची...आम्ही मजा बघत रहायचो ....
बोअर होतय...द्या तिला राज्य...
बदल हवाय...द्या तिला राज्य...


''राज्य''...या शब्दाची मला जाम गम्मत वाटते...
इतिहास सांगत आलाय की राज्य म्हणजे अभिमानाने मिळवायची गोष्ट ....पण इथे गोष्ट उलटीच...
राज्य घ्या आणि जीव जाईपर्यंत धावा ....


पुन्हा भरकटले मी....तर काय सांगत होते...
तिला आम्ही पळ पळ पळवायचो...चुकून तिनी राज्य घ्यायला नकार दिलाच तर...
लगेच तिला ठरवून आउट करायचे...


कट टू Scene 2 ...
थोड़े मोठे  झाल्यावरचे ....
तेव्हा फ़क्त माझ्याकडेच क्रिकेट ची bat होती...
आजीकडे रहायला जायची...तेव्हा अजून ३-४ मुले होती तिथे ....
तर...अगदी 'Prized Possession बर का ....(Bat..मुले नाही :))
भांडण झाले की मी Bat घेउन घरी निघून यायची...
सगळे चिड़ायचे ...ओरडायचे ...पण पुन्हा मला बोलवायला यायचे ...
असे तय Bat च्या जोरावर माझे पण राज्य चालूच...


एकाच नाण्याच्या दोन बाजू ह्या...
मी दर वेळी नाण्याच्या हव्या त्या बाजूला होते ...म्हणून आता गम्मत वाटते मला...


परवा कोणीतरी म्हणाले...सगळीच नाती मला ही अशीच वाटतात ....
कोणाचे चूक ...कोणाचे बरोबर तेच कळत नाही ...
प्रत्येक जण शेवटी ' Justified ' असतोच की ...
शेवटी काय...खेळ आहे का नाते हे महत्वाचे नाही...
महत्वाची आहे ती वृत्ती ....माझी पण आणि त्यांची पण ....