August 7, 2011

Sahi Jawab....


परवा बरेच दिवसांनी जातिवंत पुणेकर असल्याची जाणीव झाली....आणि कसं मस्त वाटलं
वेळ दुपारी बारा वाजताची...'करिश्मा' च्या चौकात शांतपणे ग्रीन सिग्नल लागण्याची वाट पाहत उभी होते...
मागून आवाज आला ...'चला...पुढे चला'....मी तेवढ्याच शांतपणे सिग्नल कड़े बोट दाखवले...आणि दुर्लक्ष केले..
तरी nonstop horn चालूच...तरी मी जमेल एवढी सहनशीलता दाखवत पुन्हा दुर्लक्ष केले...honking काही केल्या बंद होईना...सिग्नल लागल्यावर जाता जाता remark आला.

.'काय...शिक्षण जास्त झालय का?'

महत्प्रयासाने गप्प बसलेला पुणेकर खडबडून जागा झाला....मी काय ही पुणेरी बाणा दाखवायची संधी सोड्तीय....

'माझे जास्त नाही...तुमचे कमी झालय.....'

आणि मग नंतरची ३० सेकंद या विजयाचा आस्वाद घेण्यात गेली......

No comments:

Post a Comment